
Pune Accident । सध्या पुण्यातून अपघाताची एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. पुण्यातील कोंढवा गेट या ठिकाणी एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रस्त्याच्या कडेने पायी जाणाऱ्या दोन तरुणांना भरधाव कारने चिरडलं असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील व्हायरल झाले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे.
रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घडली आहे. या घटनेमुळे तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दोन मित्र रात्रीच्या वेळी कोंढवा गेटे येथून रस्त्याच्या कडेने पायी जात होते. यावेळी कार चालकाने भरधाव वेगाने कारने या दोघांना उडवले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिष नवनाथ तावरे (वय 17) आणि अजिंक्य केदार पाटील (वय 17) अशी दोघांची नावे आहेत.

या अपघातामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. त्यानंतर तेथील स्थानिक लोकांनी दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यातील अजिंक्य पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे त्याच्या कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत गुन्हा दाखल करत कारचा शोध सुरू केला.
Car accident । भीषण अपघात! भरधाव कार झाडावर आदळली, ५ ते ६ जण दगावल्याची शक्यता