Pune Accident l पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी एकनाथ शिंदेनी घेतला सर्वात मोठा निर्णय!

Pune Accident

Pune Accident l पुण्यातील कल्याणीनगर भागात एक तरुणाने पोर्शे कारने दोन तरुणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली होती. सध्या ही घटना सगळीकडे चांगलीच चर्चेत आहेत. याप्रकरणी आरोपीसह अन्य दहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्येच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. पोर्शे कार अपघात प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

Pune Illegal Pubs । पुणे बार ड्रग्ज प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई! आतापर्यंत 14 जणांना अटक, मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले ‘हे’ आदेश

पुणे शहरातील पोर्शे हिट अँड रन प्रकरणात मृत्यूमुखी पडलेला मुलांच्या पालकांनी आज वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेला तरुण अनिश अवधियाचे वडील ओमप्रकाश अवधिया आणि तरुणी अश्विनी कोष्टाचे वडील सुरेश कोष्टा यांचे यासमयी सांत्वन केले. झालेली घटना दुर्दैवी असून दोषींना कठोरात कठोर शासन केले जाईल असे यावेळी सांगितले.

Raj Thackeray । राज ठाकरे यांनी घेतला सर्वात मोठा निर्णय!

या घटनेतील अल्पवयीन आरोपीची सुटका झालेली असतानाही ही केस नव्याने हाती घेत दोषी असलेल्या सर्वांवर कारवाई केली असल्याचे सांगितले. तसेच या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून दोषींना कठोर शासन केले जाईल असेही यावेळी एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

Delhi News । धक्कादायक! इन्व्हर्टरमधील शॉर्टसर्किटमुळे घराला आग, पती-पत्नी आणि दोन लहान मुलांचा मृत्यू

तरुण मुलं अचानक गेल्याने झालेल्या दुःखाची आपल्याला पूर्ण कल्पना आहे असे नमूद करत या दोन्ही मृत मुलांच्या कुटूंबियांना विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी १० लाख रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी युवासेना सचिव किरण साळी तसेच मृत्युमुखी पडलेल्या दोघांचे इतर नातेवाईक उपस्थित होते.

Maratha Reservation । मराठा कार्यकर्ते आक्रमक, जरांगेंच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या डॉक्टराच्या तोंडाला फासले काळे

Spread the love