Pune Accident । पुण्यातील पोर्शे कारच्या अपघातानंतर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण रात्री त्याच्या इन्स्टाग्रामवर रॅप गाणे गाताना दिसत आहे. ज्यामध्ये तो अपशब्द वापरत असल्याचा आरोप आहे. पुण्यातील कार अपघाताचाही व्हिडिओमध्ये उल्लेख आहे. हा व्हिडिओ अल्पवयीन आरोपीचा असल्याचा दावा केला जात आहे. शिवीगाळ करणाऱ्या रॅप गाण्याचा सेल्फी व्हिडिओ काढलेला दिसत आहे.
Nilesh Lanke । ब्रेकिंग! निलेश लंके यांच्या ट्विटमुळे राजकारणात मोठी खळबळ
व्हायरल व्हिडिओवर कुटुंबीय काय म्हणाले?
वृत्तानुसार, आरोपीच्या कुटुंबीयांनीही हा व्हिडिओ त्यांचा नसल्याचं म्हटलं आहे. हा व्हिडिओ डीपफेक आहे का, एआय वापरून तयार करण्यात आला आहे का, याचा तपास पुणे पोलिसांनी सुरू केला आहे. हा व्हिडीओ आरोपीचा नसून तो खोटा असण्याची शक्यता आहे. हा व्हायरल व्हिडिओ एआय टूल्सचा वापर करून बनवण्यात आल्याचा अंदाज पुणे पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Sharad Pawar । भाजपसोबत युती करणार का? शरद पवार यांनी दिले उत्तर; म्हणाले…
रॅप गाण्याच्या व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे?
त्यात म्हटले होते, “मुझे बेल मिल गई है, मैं तुम्हें सड़क पर फिर से खेल दिखाऊंगा. मेरे साथ चार दोस्त थे, वो तो सीधे मेरी…मैं नशे में चूर हूं. वह जोड़ा मेरे पोर्शे के सामने आ गया. मुझे 1 दिन में जमानत मिल गई. मैं तुम्हें फिर सड़क का खेल दिखाऊंगा.” सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.