Pune Accident News । भीषण अपघात! टेम्पो-कारची समोरासमोर धडक; ३ जण जागीच ठार

Terrible accident! Tempo-car head-on collision; 3 people died on the spot

Pune Accident News । पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे मधील तोडकवस्ती या ठिकाणी एक भीषण अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या ठिकाणी कार आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी लोकांना सध्या रुग्णालयांमध्ये दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Drink Before Brushing Teeth । सकाळी ब्रश न करता पाणी पिणे कितपत फायदेशीर? जाणून घ्या एकाच क्लिकवर

नेमका कसा घडला अपघात?

याबाबतची अधिकची माहिती अशी की, तळेगाव ढमढेरे या ठिकाणच्या तोडक वस्ती मधून कविता बोरुडे आपल्या कुटुंबासोबत कारमधून जात होत्या. यावेळी अचानक समोरून एक टेम्पो आला आणि दोघांची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये कार आणि टेम्पोचा चक्काचूर झाला आहे. त्याचबरोबर तीन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

Manoj Jarange Protest । “मराठा आरक्षणाबाबत आज निर्णय घेतला नाही तर…”; मनोज जरांगे यांनी दिला सरकारला गंभीर इशारा

या अपघाताबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. आता या घटनेचा पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहे. हा अपघात नेमका कसा झाला? याबाबत अजून माहिती समोर आलेली नाही. मात्र पोलिसांनी घटनास्थळचा पंचनामा केला असून तीन मृतदेह शिवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

Uorfi Javed । कहरच! उर्फीचा ‘हा’ व्हिडीओ पाहून युजर्सना फुटला घाम, अभिनेत्रीने चक्क घातला…

Spread the love