Pune Accident News । ट्रक आणि कारचा पुण्यात भीषण अपघात! दोन जणांचा जागीच मृत्यू तर दोन वर्षाचा चिमुकला गंभीर जखमी

Pune Accident News

Pune Accident News । अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. दररोज कुठे ना कुठेही अपघात घडतच आहेत. सध्या देखील पुण्यामध्ये अपघाताची एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील भोर तालुक्यात ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन वर्षाच्या चिमुकल्यासह एक जण जखमी आहे.

Bjp । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! भाजप नेत्याची गोळ्या झाडून करण्यात आली हत्या

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवडी या ठिकाणी हा अपघात झाला आहे. किकवीकडून कापूरहोळमार्गे सासवडकडे कार निघाली होती त्याचबरोबर ट्रक सासवडकडून कापूरहोळकडे निघाला होता. यावेळी दोन्ही वाहनांची भीषण धडक झाली आणि यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Accident News । भीषण अपघात! ट्रकचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट चहा टपरीवर आदळली; ३ जणांचा जागीच मृत्यू

हा अपघात एवढा भयानक होता की, कार ट्रकच्या खाली घुसली. या धडकेमध्ये कारच्या चालकासह एका महिलेचा जागी मृत्यू झाला आहे. या घटनेमध्ये दोन वर्षाच बाळ आणि एक व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

weather update today । सावधान! थंडी वाढणार, या ठिकाणी बर्फवृष्टी होण्याची शक्यता; जाणून घ्या या राज्यांचे हवामान

Spread the love