Pune Accident News । भीषण अपघात! चालकाचे नियंत्रण सुटल्याने खाजगी बस कोसळली 50 फूट खोल दरीत; चालकाचा जागीच मृत्यू

Pune Accident News

Pune Accident News । अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. दररोज कुठे ना कुठे अपघात होत असल्याचे आपण ऐकतच आहोत. सध्या देखील एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आह. भोरच्या वरंधा घाटात मिनी बसला भीषण अपघात झाला आहे. ही बस जवळपास 50 फूट खोल दरीत कोसळली आणि या अपघातामध्ये बस चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News )

Uddhav Thackeray । उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का! ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

पुण्यावरून भोर मार्गे कोकणात जाणार आहे या मिनी बसचा वरंधा घाटात भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये चालकाचा मृत्यू झाला आहे. मात्र चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने नीरा देवघर धरणाच्या बॅक वॉटर परिसरात बस खोल दरीत कोसळली असल्याची माहिती समोर आली आहे. या बसमधून १० प्रवासी प्रवास करत होते. या प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे.

Earthquake । मोठी बातमी! अफगाणिस्तानमध्ये तीव्र भूकंप; मोठमोठ्या इमारती जमीनदोस्त; अनेकजण जखमी

बस ज्या ठिकाणी कोसळली त्या ठिकाणाहून अवघ्या ५ फुटांवर देवघर धरणाचा खोल पाणी होतं. मात्र बस झाडाझुडपात अडकल्याने मोठा अनर्थ टळला असल्याचे बोलले जात आहे. तेथील स्थानिक लोकांनी जीवाची बाजी लावून प्रवाशांचा जीव वाचवला असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये जखमी झालेल्या रुग्णांना भोर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. सध्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

Uddhav Thackeray । आत्ताची सर्वात मोठी बातमी! ठाकरे गटाच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली परवानगी; नेमकं कारण काय?

Spread the love