Pune Accident News । मागच्या काही दिवसापासून पुणे शहरात अपघाताचे प्रमाण हे वाढत चालले आहे. मद्यपान करून ड्रायव्हिंग चे प्रकार वाढत आहेत. यामुळे अनेकांना आपला जीव गमावा लागत आहे. सध्या देखील पुण्यातून अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यामध्ये मद्यधुंद कारचालकाने अपघात घडवला आहे. मद्याच्या नशेत कार चालवणाऱ्या चालकाने एकामागे एक अनेक वाहनांना धडक दिली.
मद्यधुंद चालकाने अनेक गाड्यांना उडवले. यामध्ये दुचाकी वर एक तरुण चालला होता. त्याला धडकमी मिळताच तो हवेत उडाला आणि जमिनीवर आदळला यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याचबरोबर या अपघातात दुचाकी वरील तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. पुणे येथील खराडी परिसरात हा अपघात झाला आहे. (Pune Accident News)
Bjp । भाजपला मोठा धक्का बसणार? 3 आमदार काँग्रेमध्ये जाणार?
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमीला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. यानंतर पोलिसांनी कारचालक आरोपीस अटक केली आहे. चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.