Site icon e लोकहित | Marathi News

Pune-Ahmadnagar Highway Accident । मोठी बातमी! पुणे-नगर महामार्गावर गॅस टँकरचा भीषण अपघात

Pune-Ahmadnagar Highway Accident

Pune-Ahmadnagar Highway Accident । सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे नगर महामार्गवरील वडगाव शेरी परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. गॅस वाहून नेणाऱ्या टँकरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे टँकर मधून मोठ्या प्रमाणात वायू गळती होत आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांसह अग्निशमन दलाच्या गाड्या देखील दाखल झाल्या आहेत.

Viral Video । जगातील सर्वात धोकादायक नोकरी, दोन जण बिबट्याला खायला घालतानाचा व्हिडिओ व्हायरल

सूत्रांच्या माहितीनुसार, चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. हा अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. नंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी टँकरवर स्प्रे मारणे सुरू केले. यानंतर पोलिसांनी हा रस्ता तात्पुरता सिल केला असून पर्यायी मार्गाने वाहने वळवली आहेत. (Pune-Ahmadnagar Highway Accident)

Gopichand Padalkar । गोपीचंद पडळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून धनगर समाजासाठी केली मोठी मागणी

हा टँकर रस्त्यावरच उलटा झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यासाठी अजून दोन-तीन तासांचा वेळ लागणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघातग्रस्त टॅंकर हा एका कंपनीचा असून तो पुण्याहून नगरच्या दिशेने चालला होता. यावेळी चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले आणि हा भीषण अपघात झाला आहे.

Rain Update । ठाणे-पालघरमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, वीज पडून इमारतीला आग

Spread the love
Exit mobile version