Pune Car Accident । पुण्यात पुन्हा हिट अँड रनचा धक्कादायक प्रकार; मद्यधुंद चालकाने डिलिव्हरी बॉयला चिरडले

Pune Hit And Run

Pune Car Accident । पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात मध्यरात्री हिट अँड रनची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुगल बिल्डिंगसमोर भरधाव आलिशान कारने दोन दुचाकीस्वारांना धडक दिली, ज्यामध्ये एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना रात्री 1.30 ते 1.35 वाजण्याच्या सुमारास घडली. आलिशान कारने MH12 NE 4464 नंबरच्या एक्टिवावरील तिघांना धडक दिली, त्यात तिघे किरकोळ जखमी झाले.

Ratan Tata | “…त्यामुळे रतन टाटा यांनी कधीच लग्न केलं नाही; वाचा त्यांची लव्ह स्टोरी

अपघातानंतर, कार चालकाने पुढील दुचाकीला जोरात धडक दिली, ज्यामुळे रौफ अकबर शेख गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ नोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीवरून, कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची शक्यता आहे. अपघातानंतर चालक भरधाव वेगाने कार घेऊन फरार झाला, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Cabinet Metting । सर्वात मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले मोठे धडाकेबाज निर्णय

पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे कारचा नंबर काढला आणि कारचालकाचा मोबाईल नंबर वापरून त्याला शोधले. आरोपी आयुष प्रदीप तयाल (वय 34 वर्षे, रा. हडपसर) याला पोलिसांनी त्याच्या घरातून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी अपघाताच्या संदर्भात विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Sanjay Raut । सर्वात मोठी बातमी! खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे आणि नागरिकांनी पुन्हा एकदा हिट अँड रनच्या वाढत्या घटनांबद्दल संताप व्यक्त केला आहे. काही महिन्यांपूर्वीही कल्याणी नगर परिसरात अशीच एक धक्कादायक घटना घडली होती, ज्यामुळे समाजामध्ये याबाबत चिंता वाढली आहे. नागरिकांची सुरक्षितता प्रश्न पुन्हा एकदा उभा राहिला आहे.

Manoj Jarange l धक्कादायक! मनोज जरांगेंच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या डॉक्टरवर शाईफेक!

Spread the love