
Pune Lok Sabha । पुणे : पुण्यात आता काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विरुद्ध भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) विरुद्ध वसंत मोरे (Vasant More) अशी तिहेरी लढत होणार आहे. आगामी लोकसभेच्या तोंडावर तिन्ही नेत्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. अटीतटीच्या लढतीत कोणाचा विजय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. (Latest marathi news)

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या रवींद्र धंगेकर यांच्या बैठकीसाठी फ्लेक्स लावले होते. पण या फ्लेक्सवर एक नेते आणि माजी राज्यमंत्री यांचा फोटो टाकला नाही, त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी थेट मंडपवाल्याला मारहाण केली आहे. मेळावा सुरू होण्यापूर्वीच हा सर्व प्रकार घडला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Eknath Shinde । निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढली; या ठिकाणी बसणार मोठा धक्का
दरम्यान, कालच केसरीवाडा येथे काँग्रेसमधील अंतर्गत वाद समोर आले होते. अशातच आता पुन्हा एकदा असाच प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे कॉंग्रेसमधील नाराजी काही संपत नसल्याचं पाहायला मिळत आहे. याचा परिणाम आगामी लोकसभा निवडणूकीवर देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.