Pune Crime । मागच्या काही दिवसापासून पुण्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण हे वाढतच चालले आहे. मागच्या काही दिवसापूर्वी पुण्यात कोयता गॅंगने तर धुमाकूळ घातला आहे. त्यानंतर आता पुण्यात कोयता गॅंगनंतर स्प्रे गॅंगने धुमाकूळ घातल्याची माहिती मिळत आहे. शाळकरी मुला मुलींवर स्प्रेचा फवारा मारत त्यांना त्रास दिला जात आहे.
याबाबत अधिकची माहिती अशी की, पुण्यामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये अवसरी खुर्द या गावात मुला मुलींवर चार अज्ञात फवारा करताना दिसले. दबा धरून हे टोळकं शाळकरी मुला मुलींना त्रास देत. यामधील धक्कादायक बाब म्हणजे यामुळे अंगाला खास सुटणे, सुज येणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आठवीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांच्या तोंडावर चार अज्ञातांनी स्प्रे मारला यावेळी सोबत असलेल्या मैत्रिणीने आरडाओरडा केल्याने अज्ञात लोकांनी घटनास्थळावरून पळ काढला. असाच प्रकारे इतर विद्यार्थ्यांबाबत देखील घडला आहे. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लवकरात लवकर यांच्या मुसक्या आवळाव्यात अशी देखील नागरिकांनी मागणी केली आहे.
पीएसआयने Dream 11वर जिंकले दीड कोटी रुपये, त्यानंतर चर्चेत आला मात्र आता…
पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ
पुणे शहरामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पुणे शहरात गेल्या सात महिन्यात एकूण 47 जणांचा खून झाल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर कोयता गॅंग देखील पुन्हा सक्रिय झाली आहे. एका वर्षात त्यांनी शंभर पेक्षा अधिक हल्ले केले आहेत. मारामारी, घरपोडी प्रकारही सर्रास पुण्यामध्ये सुरूच आहेत.