Pune Crime | ब्रेकिंग न्यूज! पुणे शहरात आणखी एका गुंडाची हत्या

Pune Crime

Pune Crime | पुणे शहराला विद्येचे माहेरघर म्हटले जात। मात्र पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रकार वाढत चालले आहे. यामुळे पुणे खरच सुरक्षित आहे का? असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान आता पुण्यामध्ये आणखी एका गुंडाला संपवण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे पुन्हा एकदा गुन्हेगारी जगताचा सुळसुळाट असणाऱ्या पुण्यानं अनेकांना धडकी भरवली आहे.

Sharad Mohol | असा ठरला शरद मोहोळच्या हत्येचा कट, वाचा नेमकं काय घडलं?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात लष्कर परिसरात नागरिकांना वेठीस धरून त्यांच्याकडून पैसे आणि लुटणाऱ्या एका सराईत गुंडाला बहिणीची छेड काढल्यामुळे तरुणीच्या भावाने त्याच्या दोन मित्रांसह हत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. सीसीटीव्ही कॅमेरामुळे ही संपूर्ण घटना उघडकीस आल्याचे बोलले जात आहे.

Makar Sankranti 2024 । पतंगचा माेह जीवावर बेतला! घराच्या छतावरून पडून एकजण जागीच ठार

हत्या केलेला गुंड हा पुण्याच्या भवानी पेठेतला रहिवासी असून लोकांमध्ये त्याची दहशत होती. तो लोकांना मारहाण करायचा त्याचबरोबर त्यांच्या खिशातील पैसे काढून घ्यायचा भवानी पेठ आणि कॅम्प भागातील विक्रेत्यांवर तो दादागिरी करायचा.

Deepti Sharma । ICC कडून मोठी घोषणा! टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूला दिला पुरस्कार

यानंतर त्याने एका तरुणीची छेड काढली होती. त्यामुळे संतापलेल्या तरुणीच्या भावाने दोन मित्रांसोबत कट रचला आणि त्याची हत्या केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे.

Spread the love