Pune Crime । मागच्या काही दिवसापासून पुण्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. कोयता गॅंगने तर पुण्यामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पुण्यामध्ये खून, मारामारी, हल्ले, अमली पदार्थांचे सेवन अशा प्रकारांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. आता सध्या देखील पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यामधील ससून रुग्णालयाच्या (Sassoon Hospitals) प्रवेशद्वाराजवळ दोन कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत.
Viral Video । ऐकावं ते नवलंच! पाण्याऐवजी हँडपंपमधून निघाली आग, कसे ते जाणून घ्या
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातून १ किलो ७५ ग्रॅमचे ड्रग जप्त केल्याची माहिती मिळत आहे. सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ मिळाली आहे. जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत जवळपास दोन कोटी रुपये इतकी आहे. (Pune Crime News)
पुणे शहरांमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी मध्ये वाढत होताना दिसत आहे. त्याचबरोबर आता उघडकीस झालेल्या धक्कादायक प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. यामुळे पुणे सुरक्षित आहे का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. सध्या या प्रकरणाचा अधिकचा तपास आता पोलिस यंत्रणा करत आहे.
Rahul Gandhi । राहुल गांधींच्या पुन्हा अडचणी वाढणार? न्यायालयाकडून नोटीस जारी