Pune crime । पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रामटेकडी परिसरात कोयता टोळीने सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर कोयत्याने हल्ला केला आहे. या घटनेने पुण्यात खळबळ माजली आहे आणि पोलिसांसाठी ही एक मोठी चिंतेची बाब बनली आहे.
Accident News । गाईला वाचवण्याच्या नादात शिवशाही बसचा भीषण अपघात, २८ प्रवाशी जखमी तर एकजणाचा मृत्यू
सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड हे कोयता टोळीच्या गुंडांना पकडण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला. हल्ला करणाऱ्याचे नाव निहाल सिंग असे आहे. हल्ला इतका गंभीर होता की, गायकवाड गंभीरपणे जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरु आहेत.
Share Market Holiday l कृष्ण जन्माष्टमीला शेअर मार्केटला सुट्टी राहणार का? वाचा महत्वाची माहिती
हा हल्ला पुण्यातील सुरक्षा व्यवस्थेवर एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करतो आहे. दीड दमडीची किंमत असलेल्या गुंडांपुढे पोलिसांचेही संरक्षण धोक्यात आले आहे, हे दर्शवणारा हा घटना आहे. अशा परिस्थितीत नागरिकांची पोलिसांवर असलेली विश्वासाची भावना कमकुवत होऊ शकते आणि तक्रार करण्यास ते घाबरू शकतात, अशी चिंतेची बाब आहे.
Badlapur Case Update । बदलापूर अत्याचार प्रकरण: एसआयटी चौकशीत धक्कादायक माहिती
पुण्यातील या घटनेनंतर पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था तपासण्याची आणि गुंडांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी वाढली आहे. शहरातील सुरक्षा व्यवस्थेची पुनरिक्षणाची आवश्यकता आहे आणि अशा प्रकारच्या गुंडगिरीला लगाम घालण्यासाठी अधिक कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
Ladaki Bahin Yojana l लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारने घेतला मोठा निर्णय!