Site icon e लोकहित | Marathi News

Pune Crime | धक्कादायक! पुण्यात भर रस्त्यात प्रसिद्ध सराफा व्यावसायिकावर गोळीबार, कोट्यवधीचे दागिने लुटले

Pune Crime

Pune Crime | मागच्या काही दिवसापासून पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या देखील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे,. दिवाळीच्या तोंडावर पुण्यातील प्रसिद्ध सराफा व्यवसायावर गोळीबार (Shooting at famous bullion business) करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बुधवारी रात्री दुकान बंद करून घरी जाणाऱ्या सराफावर भर रस्त्यात गोळीबार करण्यात आला आहे.

Sharad Pawar-Uddhav Thackeray । शरद पवार-उद्धव ठाकरे यांच्या भेटीत काय चर्चा झाली? ठाकरे गटाच्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यामधील वानवडी भागातील बीटी कवडी रोड जवळ ही घटना घडली आहे. या घटनेमध्ये सराफा व्यवसाय गंभीर जखमी झाला आहे. त्याचबरोबर गोळीबार करणाऱ्यांनी व्यवसायिकाकडील सोन लुटून नेल्याची देखील माहिती मिळत आहे. सध्या या गोळीबाराच्या घटनेनंतर तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Viral News । लग्नानंतर काही दिवसातच पतीला समजले पत्नीचे भयानक रूप!

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि अधिकचा तपास सुरू केला आहे. दरम्यान हा गोळीबार नेमका कोणी केला? कोणत्या कारणावरून करण्यात आला? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर पुण्यातील प्रसिद्ध सराफा व्यावसायिकावर गोळीबार झाल्यामुळे पुणे शहर हादरले आहे. माहितीनुसार गोळीबार करून हल्लेखोरांनी कोट्यावधी रुपयांचे सोने लुटले आहे. हल्लेखोरांनी पाळत ठेवून हा प्रकार केला असल्याचे देखील बोलले जात आहे.

Rohit Pawar । मॅक्सवेलचं द्विशतक अन् शरद पवारांचा ‘तो’ फोटो, रोहित पवार यांनी केले ट्विट

Spread the love
Exit mobile version