Pune Crime News । पुण्यातील धक्कादायक घटना! पैशासाठी माजी महिला नगरसेविकेवर मित्राने केला अत्याचार

Pune Crime News

Pune Crime News । पुणे : मागच्या काही दिवसापासून पुणे शहरांमध्ये गुन्हेगारी वाढत चालली असल्याचे दिसत आहे. पुणे शहरांमध्ये कोयता गॅंगने तर मागच्या काही दिवसापासून धुमाकूळच घातला आहे. त्याचबरोबर अन्य गुन्ह्यांमध्ये देखील वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्येच आता पुणे शहरातून एक अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा अत्याचार एका माजी नगरसेविका महिलेवर झाल्याची माहिती समोर आली आहे.

Ajit Pawar । ब्रेकिंग! अजित पवार मुख्यमंत्री होणार? बड्या नेत्याच्या दाव्याने उडाली खळबळ

पुणे शहरात एका माजी नगरसेविकेवर तिच्या मित्रांनी अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणी नगरसेविकेने पोलिसात फिर्याद दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मित्र असलेल्या आरोपीवर काही धमक्या देत पैसे घेतल्याचा आरोप देखील नगरसेविकेने केलेला आहे. आता याबाबतचा अधिक तपास पोलीस यंत्रणा करत आहे.

Success story । इंदापूरच्या पट्ठ्याने करून दाखवले! 10 गुंठ्यातील वांग्याने बनला लाखोंचा धनी

याबाबत अधिकची माहिती अशी की, पुणे येथील माजी नगरसेविका असलेल्या महिलेची एका व्यक्तीसोबत मैत्री होती. सचिन मच्छिंद्र काकडे असे या व्यक्तीचे नाव आहे. त्या मैत्री संबंधातून काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ही व्यक्ती नगरसेविकेवर अत्याचार करत. 2017 पासून हा आरोपी नगरसेविकेला धमकी देत सातत्याने अत्याचार करत. यामुळे नगरसेविकेने अखेर पोलिसात धाव घेत या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Black Diamond Apple । जगातलं सर्वात महागडं सफरचंद, किंमत जाणून उडतील तुमचे होश

Spread the love