
Pune Crime News । राज्यात गुन्ह्याचे (Crime) प्रमाण वाढत चालले आहे. कायदे (Laws) कडक करून देखील अजून गुन्हेगारीला आळा बसला नाही. कित्येक गुन्ह्यांमधून अनेक निष्पाप लोकांचे प्राण जातात. धकाकदायक बाब म्हणजे क्षुल्लक कारणावरून गुन्हे घडत आहेत. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी (Pune Police) कडक पाऊले उचलली आहेत तरी देखील पुण्यात गुन्हे घडतच आहेत. सध्या देखील पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
पुण्याच्या खराडी परिरामध्ये क्षुल्लक कारणावरुन एका तरुणाची चारचाकी गाडी पेटवून देण्यात आली आहे. तसेच त्यांनी एका महिलेलादेखी पेटवण्याचा प्रयत्न केला. संबंधित प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकारामुळे तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपीचा एका तरुणाशी गाडी पार्क करण्यावरुन वाद झाला होता. या वादातून आरोपीने थेट चारचाकी गाडी पेटवून टाकली. त्याचबरोबर आरोपींनी एका महिलेला देखील पेटवण्याचा प्रयत्न केला. गाडी पेटवल्यानंतर त्या ठिकाणी एक महिला आली यावेळी आरोपींनी महिलेवर पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न केला. आता याप्रकरणाचा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
Eknath Shinde । शिवनेरी किल्ल्यावरून मराठा आरक्षणासंदर्भात एकनाथ शिंदे यांनी केली सर्वात मोठी घोषणा!