Pune Crime News । पुणे शहरात मागच्या काही दिवसापासून गुन्हेगारीचे प्रमाण हे वाढतच चालले आहे. भरदिवसा पुणे शहरात गुन्हेगारी घडत आहे. यामुळे पुणे खरंच आता सुरक्षित राहिले आहे का? असा मोठा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित झाला आहे. दरम्यान, सध्या देखील पुण्यातील कात्रज चौक परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Breaking News । मराठा आरक्षणासंदर्भात सर्वात मोठी बातमी आली समोर
पुणे शहरातील कात्रज चौक परिसरात डोक्यात दगड घालून खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे तेथील परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मोठी खळबळ उडाली आहे. अज्ञातांनी अतिशय निर्घृणपणे व्यक्तीची हत्या केली आहे. (Pune Crime News)
Congress । मोठी बातमी! काँग्रेसला मोठा धक्का बसणार; मुंबईतील बडा नेता शिंदे गटात जाणार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज चौकात भाजी मंडईच्या कोपऱ्यावर ही घटना घडली आहे. रस्त्याच्या कडेने एक व्यक्ती जात असताना त्या व्यक्तीची नजर रस्त्याच्या कडेला पडली यावेळी व्यक्तीचा दगड ठेचलेल्या अवस्थेतील मृतदेह त्या ठिकाणी आढळून आला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच घटना पाहण्यासाठी त्या ठिकाणी बघ्यांची देखील मोठी गर्दी होती. त्याचबरोबर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या या घटनेचा अधिकचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे.
Maratha Reservation । बिग ब्रेकिंग! जरांगेंच्या मुंबईतील सभेबाबत उच्च न्यायालयाने स्पष्टच सांगितलं