Pune Crime News । पुण्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच चालली आहे. पुण्यातील वाढती गुन्हेगारी पाहता पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यात दररोज अनेक ठिकाणी वेगेवेगळ्या घटना घडत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. छोट्या गुन्ह्यांपासून ते मोठ्या गुन्ह्यांपर्यंत अनेक गुन्हे हे पुणे शहरात वाढतच चालले आहेत. सध्या देखील पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
पुण्यातून खुनाची एक घटना समोर आली आहे. पोटच्या मुलानेच आपल्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माहितीनुसार, खडकी पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे. एका मुलाने आपल्या ५५ वर्षीय आईचा निर्घुन पद्धतीने खून केला आहे. आईचा खून केल्यांनतर आरोपी मुलाने घरातून पळ काढला असून तो फरार आहे.
Pune Crime । शरद मोहोळच्या पत्नीला धमकवलेल्या आरोपीने ससून रुग्णालयातुन ठोकली धूम!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंभाबाई शंकर पवार असं मृत आईचं नाव आहे. मुलाने आईची हत्या आपल्या राहत्या घरात केली. कुणाला संशय येऊनये म्हणून घराला कुलूप लावले आणि त्या ठिकाणाहून पळ काढला. सध्या खडकी पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू.