Pune Crime । पुणे हादरलं! जन्मदात्या बापाने मुलीवर कुऱ्हाडीने केले वार

crime

Pune Crime । पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. पुण्यात सर्रासपणे गुन्हे हे घडत चालले आहेत. मात्र सध्या पुण्यातून अशी एक घटना समोर आली आहे जे ऐकून तुम्हालाही मोठा धक्का बसेल. वडील आणि मुलीचे नाते हे खूप प्रेमळ नातं असतं. वडिलांचा आपल्या मुलीवर सर्वात जास्त जीव असतो असं नेहमीच म्हटलं जातं. मात्र आता याच नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. (Latest Marathi News)

Bacchu Kadu । ब्रेकिंग! बच्चू कडू यांना सर्वात मोठा धक्का

आपल्या जन्मदात्या मुलीवर वडिलांनी धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्याच्या वाघोलीतून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जन्मदात्या बापाने अक्षरशः स्वतःच्या मुलीवर कुऱ्हाडीने डोक्यावर, हात-पायावर वार करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.

Chhatrapati Sambhajinagar । “डॉक्टर मला साप चावलाय माझ्यावर उपचार करा”, दंश केलेल्या सापाला घेऊन चिमुकला गेला थेट रुग्णालयात

या हल्ल्यामध्ये मुलगी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमी अवस्थेत तिला रुग्णालयामध्ये उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर मुलीच्या मावशीने पोलिसात तक्रार दाखल केली. सध्या आता या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहे. ही घटना पुण्यातील लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.

Manoj Jarange । मनोज जरांगे यांच्या घरात कुणबी नोंदी नाहीत; धक्कादायक माहिती समोर

Spread the love