Pune Crime । पुण्यात वानवडी परिसरात घडलेल्या एक धक्कादायक घटनेत, 45 वर्षीय शाळा बसच्या ड्रायव्हरवर दोन सहा वर्षांच्या चिमुकलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण पुण्यात हळहळ व्यक्त केली आहे. पीडित मुलींवर चार दिवसांपासून अत्याचार करण्यात आले होते, परंतु आरोपीने त्यांना कुणालाही सांगितल्यास गंभीर परिणाम होण्याची धमकी दिली होती.
Ajit Pawar । “आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला आहे”- अजित पवार
स्थानिक पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी एका नामांकित शाळेच्या विद्यार्थ्यांना बसमधून शाळेत सोडत होता. या दोन्ही मुली त्या बसमधील पुढच्या सीटवर बसायच्या. गेल्या चार दिवसांत, ड्रायव्हरने मुलींवर अश्लील कृत्ये केली. पीडित मुलींपैकी एका मुलीला घरी येताच वेदना जाणवू लागल्या, ज्यामुळे तिच्या आईने तिचा विश्वासात घेत विचारणा केली. मुलीने सर्व सत्य उघड केले, ज्यामुळे या घृणास्पद प्रकाराचा पर्दाफाश झाला.
Reliance Digital offer । 13,000 रुपये देऊन खरेदी करा iPhone 16; रिलायन्स डिजिटलवर खास ऑफर
पोलिसांनी तात्काळ आरोपीविरोधात पॉक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची चौकशी सुरू असून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. समाजातील हा प्रकार गंभीर चिंता निर्माण करतो, आणि या प्रकरणामुळे शाळेतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभ राहिला आहे. सध्याच्या काळात अशा घटना पुन्हा न होण्यासाठी कडक उपाययोजना आवश्यक आहेत.