
Pune Crime । पुण्यात दिवसाढवळ्या दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात अनेक मोठमोठे गुन्हे घडतच आहेत. यामुळे पुण्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या देखील पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शुक्रवारी (९ फेब्रुवारी) पुण्यातील बुधवारपेठेतील क्रांती चौकामध्ये एका तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास कार्याला सुरवात केली. सध्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नईम शेख असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचबरोबर याप्रकरणी कलाम उर्फ रूबेल शेख याला पोलिसांनी अटक अटक आहे.
Pune Crime News । गोळीबाराच्या घटनेने पुणे हादरलं, पैशाच्या वादातून झाडल्या गोळ्या
याबाबत अधिकची माहिती अशी की, बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत पश्चिम बंगालमधील महिला राहायला आहे. आरोपी कलाम शेख तिचा पती असून सहा महिन्यांपूर्वी महिलेने नईम शेख याच्याशी विवाह केला होता. आपल्या पत्नीने दुसरे लग्न केले त्यामुळे आरोपीला राग अनावर झाला आणि याच रागातून आरोपीने नईम शेख याच्या गळ्यावर वस्ताऱ्याने वार केले.
ही घटना घडताच त्या ठिकाणी आरडाओरड झाल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. त्यांनतर तेथील स्थानिकांनी गंभीर जखमी झालेल्या नईमला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता.