
Pune Crime । पुण्यात रंग लावण्याच्या वादातून एका तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. येरवडा परिसरातील संगमवाडी भागात रात्री साडे आठच्या सुमारास ही घटना घडली. त्यात ऋतिक ननावरे या २० वर्षीय तरुणावर हल्ला करण्यात आला, ज्यामुळे तो गंभीरपणे जखमी झाला आहे.
Supriya Sule । बरं झालं पक्ष फुटला, सुप्रिया सुळे यांचं धक्कादायक वक्तव्य
मिळालेल्या माहितीनुसार, ऋतिक ननावरे आणि त्याचा १७ वर्षीय भाऊ रोहित ननावरे हे राजीव गांधी नगर परिसरातून जात असताना, दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवले आणि रंग लावून त्याच्या डोक्यावर अंडं फोडली. यामुळे रोहितने आपला भाऊ ऋतिकला सांगितले. ऋतिक नंतर त्या दोन तरुणांकडे जाऊन रंग लावण्याबद्दल त्यांना जाब विचारण्यासाठी गेला, मात्र वाद उफळला.
Central Bank l धक्कादायक! सेंट्रल बँकेत भीषण आग, कागदपत्रे आणि पैसे जळून खाक
आरोपी बबल्या आणि त्याच्या साथीदाराने मिळून ऋतिकला मारहाण केली आणि कोयत्याने त्याच्या शरीरावर वार केले. त्याचबरोबर, आरोपींनी त्याच्या पोटात दगड घातला. या गंभीर हल्ल्यात ऋतिक जखमी झाला आणि तो तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेला.
Vasai Accident News l होळीच्या दिवशी दुर्दैवी अपघात: मामा-भाच्याचा दु:खद मृत्यू