Pune Fire News । पुण्यामध्ये आगीचे प्रकार हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. मागच्या काही दिवसापासून पुण्यामध्ये आग लागल्याच्या अनेक घटना घडला आहेत. यामुळे मोठे नुकसान झाले असून काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. सध्या देखील पुण्यामधून आगीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील विमान नगर भागात भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे.
एकाच वेळी दहा सिलेंडर फुटल्याने भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तेथील परिसरात एकच खळबडे उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रित आणण्याचा प्रयत्न केला व आग नियंत्रणात आली. सिलेंडरचा स्पोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सुदैवाने या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील विमान नगर या ठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीमध्ये बेकायदेशीर रित्या सिलेंडरचा साठा करण्यात आला होता. या ठिकाणी जवळपास १०० सिलेंडर साठवण्यात आले होते. या शंभर मधील १० सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.