
Pune Fire News । मागच्या काही दिवसापासून पुण्यामध्ये गुन्हेगारी, अपघात आणि आग लागल्याच्या घटना या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. सध्या देखील पुण्यातील नऱ्हे परिसरात असलेल्या अंबामाता मंदिराजवळ एका ऑटो गॅरेजला मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीमध्ये गॅरेजमध्ये असलेली १० वाहने जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे. (Pune Fire News)
Accident News । कारला विमानाने दिली मागून जोरदार धडक, चालक आणि पायलट दोघेही जखमी; रुग्णालयात दाखल
या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नाही. मात्र गॅरेजमध्ये असलेली १० वाहने पूर्ण जळून खाक झाली आहेत. यामध्ये ४ चारचाकी वाहने आणि ६ चाकी वाहनांचा समावेश आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.
Video । भीषण अपघात, खेळता खेळता 3 वर्षाच्या मुलीवर काचेचा दरवाजा पडला, धक्कादायक व्हिडीओ आला समोर
ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान मागच्या काही दिवसापासून पुण्यात आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. 23 नोव्हेंबरला देखील शहरातील वेस्टर्न मॉल मध्ये भीषण आग लागली होती. ही घटना ताजी असतानाच आता नऱ्हे परिसरातील असलेल्या ऑटो गॅरेजला मंगळवारी रात्री साडे बाराच्या सुमारास भीषण आग लागल्याची माहिती समोर आली.
Heavy Rain । अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर दुःखाचा डोंगर, नुकसान भरपाई कशी होणार?