Pune Fire News । मागच्या काही दिवसातपासून पुण्यामध्ये आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या देखील पुण्यातून आगीची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे शहरातील गंगाधाम परिसरात असलेल्या एका गॅरेजला शुक्रवारी (ता. १५) पहाटे ३ वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. यामुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे.
Bjp । भाजपला मोठा धक्का! निवडणुकीच्या तोंडावर बड्या नेत्यावर गुन्हा दाखल
क्षणार्धात आगीचा भडका संपूर्ण गॅरेजला आग लागली. ही आग एवढी भीषण होती की यामध्ये गॅरेजचे खूप नुकसान झाले आहे. आग लागल्याची माहिती समजताच तेथील जवळच्या लोकांनी आरडाओरड केला. यानंतर त्या ठिकाणच्या स्थानिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. यानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणण्यात यश आले.
सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या आगीमध्ये तब्बल १७ चारचाकी वाहने जळून खाक झाली आहेत. त्याचबरोबर गॅरेजचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कोणत्या कारणाने लागली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. माहितीनुसार, पुण्यातील गंगाधाम परिसरात आई माता मंदिराजवळ मोकळ्या जागेत एक प्रसिद्ध गॅरेज आहे.