Pune GBS Disease । धक्कादायक! पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम (GBS) ची दहशत, वाढते रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण

Pune GBS Disease

Pune GBS Disease । पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम (GBS) या आजाराने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. जानेवारी महिन्यात या आजाराच्या रुग्णांची संख्या अचानकपणे वाढली असून, राज्यभरात GBS च्या रुग्णांची संख्या 127 वर पोहोचली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका 56 वर्षीय महिलेचा GBS मुळे मृत्यू झाला आहे. या मृत्यूचा कारण श्वसनक्रिया थांबणे आणि अर्धांगवायू असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

Mahakumbh Stampede । महाकुंभमध्ये चेंगराचेंगरीनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे भाविकांना महत्त्वाचे आवाहन

सिंहगड रस्ता परिसरात GBS चे रुग्ण जास्त आढळल्यामुळे महापालिकेने त्याठिकाणी अतिसार आणि उलट्या असलेल्या रुग्णांचे सर्वेक्षण केले. यानंतर जलस्रोतांसाठी परीक्षण करण्यात आले आणि त्यात ई-कोलाय व कॉलिफॉर्म जीवाणू आढळले. परिणामी, या पाण्याचे उपचार न करता वापरु नये, असे सुचविण्यात आले आहे.

Baba Siddiqui । सर्वात मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात भाजपच्या नेत्याचे नाव समोर

आरोग्य विभागाने पुणेकरांना पाणी गाळून आणि उकळून प्यायचे आवाहन केले आहे. तसेच, महापालिकेने सर्व सोसायट्यांना बोअरवेल आणि विहिरीचे पाणी तपासूनच वापरण्याचे सांगितले आहे. GBS च्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुणेकरांमध्ये तणावाचे वातावरण आहे आणि या आजाराबाबत असंख्य संभ्रम निर्माण झाले आहेत.

Eknath Shinde । एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार नव्हते, बड्या नेत्याच्या गौप्यस्फोटाने राजकारणात उडाली मोठी खळबळ

Spread the love