
Pune Koyta Gang News । मागच्या काही दिवसापासून पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण हे वाढतच आहे. दररोज पुणे शहरात हे मोठ मोठे गुन्हे घडत आहेत. वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. मागच्या काही दिवसापासून पुण्यात कोयता गॅंग चांगलीच सक्रिय झाली आहे. ही गॅंग गाड्यांची तोडफोड तसेच लोकांना हाणमार करत आहे. सध्या देखील कोयता गॅंगने पुन्हा एकदा पुण्यात धुमाकूळ घातला आहे. (Pune News)
काल मध्यरात्रीच्या सुमारास कोयता गॅंगने वाहनांची मोठी तोडफोड केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील येरवडा परिसरामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून या तोडफोडीत जवळपास 20 ते 25 वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये दुचाकी, कार आणि रिक्षा या वाहनांचा समावेश आहे. या घटनेमुळे तेथील परिसरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत. मात्र पुन्हा एकदा पुणे खरंच सुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत चालले आहे. त्यामुळे लवकरात लवकर अशा हुल्लडबाजांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील पुणेकरांनी केली आहे.