Pune Koyta Gang । पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. मात्र मागच्या काही महिन्यांपासून पुण्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. ड्रग्ज तस्करी, ससूनमधील गैरकारभार त्याचबरोबर शहरात भर दिवसा होणारे कोयते हल्ले यामुळे आता पुणेकर धास्तावले आहेत. सध्या देखील एका ताज्या घटनेने पुणे शहरात पुन्हा एकदा कोयता गॅंगची दहशत पाहायला मिळाली आहे.
Assembly Elections । विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज, अजित पवार टाकणार नवीन डाव
पुण्यातील कॅम्प ( (PuneCamp ) ) परिसरामध्ये कोयता गॅंगची दहशत पाहायला मिळाली आहे. कॅम्प परिसरात या गॅंगने वाईन शॉपची तोडफोड केली. चार ते पाच अज्ञातांनी वाईन शॉपची तोडफोड केल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे तेथील स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Granulated Sugar । खडीसाखर कशी बनवली जाते? आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे? जाणून घ्या महत्वाची माहिती
मागच्या अनेक दिवसापासून कोयता गॅंगने पुणे शहराच्या विविध भागांमध्ये धुडकूस घातलाय. पोलिसांनी ठोस पाऊले उचलून देखील यावर कोणताच परिणाम होत नसल्याचे दिसत आहे. या गॅंगने नुकतीच हडपसर फुरसुंगी परिसरातील अनेक दुकानांची तोडफोड केली. रस्त्यावरील वाहनांच्या काचाही फोडल्या. यामधील सर्वात गंभीर बाब म्हणजे पोलिसांनी अटक केलेल्या ५ जणांपैकी ३ जण अल्पवयीन मुलं आहेत.