भाजपचे खासदार गिरीश बापट ( Girish Bapat) यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघात जागा रिक्त आहे. या मतदारसंघात पोटनिवडणूक होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याच महिन्यात ही निवडणूक जाहीर होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पाऊले उचलली आहेत. मतदानासाठी पुणे लोकसभा मतदान केंद्र सुस्थितीत आहे का ? याची खात्री करून घेण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून नुकतेच देण्यात आले आहेत. ( Pune Loksabha Election)
गौतम गंभीरला पाहून चाहत्यांनी ‘कोहली-कोहली’ जयघोष सुरू केला; पाहा Video
ही निवडणूक कधी लागणार याकडे पुणेकरांसह विविध राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. ही पोटनिवडणूक लढवण्यासाठी भाजपकडून (BJP) मुरलीधर मोहोळ, स्वरदा बापट, मेधा कुलकर्णी, सिद्धार्थ शिरोळे हे उमेदवार इच्छुक आहेत. तर महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) ही जागा आम्हाला द्यावी अशी मागणी काँग्रेसकडे केली आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघातील ( Pune Loksabha ) मतदार याद्या अद्ययावत करणे, मतदान केंद्रांची पाहणी आणि ‘ईव्हीएम’ मशिनची तपासणी करणे या निवडणूकपूर्व कामांची तयारी जोरदार सुरू आहे. दरम्यान या मतदारसंघाचे अक्षांश व रेखांशासह फोटो काढून लेखी आदेश सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.