
Pune Metro । 1 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या दोन मार्गाचे उद्घाटन झाले आहे. सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रूबी हॉल हे दोन मार्ग पुणेकरांना मिळाले आहेत. त्यामुळे पुणेकरांची वाहतूक कोंडी पासून सुटका झाली असून पुणेकर मेट्रोच्या प्रवासाचा आनंद घेत आहेत.
Uddhav Thackeray । “उद्धव ठाकरे नमकहराम माणूस”, टीका करताना भाजप आमदाराची घसरली जीभ
त्याचबरोबर आता मेट्रो मधून प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. पुणेकरांमध्ये देखील मेट्रोचे एक वेगळीच आकर्षण निर्माण झाले असून काल रविवारी सुट्टी असून देखील मेट्रो प्रवाशांचा विक्रम झाला आहे. आतापर्यंत सर्वाधिक प्रवासाचा हा विक्रम झाला असल्याची माहिती समोर आली आहे. (Pune Metro online ticket booking)
आनंदाची बातमी! अवघ्या एका तासात मिटेल १२ वर्षांपूर्वीचा शेतीचा जुना वाद, ‘ही’ योजना येईल कामी
96 हजार 498 प्रवाशांनी केला मेट्रोने प्रवास
रविवारी मेट्रो ने प्रवास करणाऱ्या लोकांच्या संख्येत चांगलीच वाढ झाल्याची पाहायला मिळाली. एका दिवसात जवळपास 96 हजार 498 प्रवाशांनी मेट्रो ने प्रवास केला आहे. आतापर्यंत प्रवाशांची ही सर्वात जास्त संख्या असल्याचे देखील बोलले जात आहे.
Rahul Gandhi । ब्रेकिंग! राहुल गांधी पुन्हा दिसणार संसदेत, अखेर मिळाली खासदारकी..
पुणेकरांना मेट्रोचे आकर्षण
पुणे शहरात मेट्रो चालू झाल्यापासून शहरातील लोकांना याचे चांगलेच आकर्षण वाटू लागले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मेट्रो प्रवासांची संख्या देखील वाढत आहे. मेट्रोने प्रवास केल्यानंतर वाहतूक कोंडीतून सुटका होत असल्याचे पुणेकरांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर मेट्रो ने प्रवास देखील अगदी काही मिनिटातच होत आहे. त्यामुळे प्रदूषण होणार नसल्याने वातावरण देखील चांगले राहणार आहे. त्यामुळे पुणेकरांच्या पसंतीस मेट्रो आली आहे.