Pune Metro | नरेंद्र मोदींच्या हस्ते पुण्यामध्ये मेट्रो झाली सुरू; काय आहे तिकीट दर? जाणून घ्या एका क्लिकवर

Pune Metro Metro started in Pune by Narendra Modi; What is the ticket price? Know in one click

Pune Metro | पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिव्हिल कोड ते पिंपरी चिंचवड गरवारे कॉलेज स्टेशन ते रुबी हॉल या दोन योजनांचे लोकार्पण मंगळवारी म्हणजेच आज झाले आहे. यानंतर पुणे मेट्रो सर्वसामान्य पुणेकरांसाठी सुरू झाली आहे. त्यामुळे पुणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे आता मेट्रोमुळे पुणेकरांचा प्रवास अगदी सोयीस्कर होणार आहे.

Samruddhi Mahamarg Thane । समृद्धी महामार्गाचे काम चालू असतानाच घडली मोठी दुर्घटना! 17 जण जागीच ठार

पुणे मेट्रो सुरु झाल्यामुळे पिंपरी चिंचवड वरून 20 ते 30 मिनिटांमध्ये नागरिकांना पुणे शहरात येता येणार आहे. त्याचबरोबर नागरिकांची वाहतूक कोंडीतून देखील मोठी सुटका होणार आहे.

जबरदस्त फीचरसह स्मार्टफोनपेक्षाही स्वस्तात खरेदी करता येईल जिओचा नवीन लॅपटॉप, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल पुणे मेट्रोची नेमकी वेळ कोणती? तर जाणून घेऊयात

सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत दोन्ही मार्गावर मेट्रो सुरु राहणार आहेत. त्याचबरोबर गर्दीच्या वेळेमध्ये दर दहा मिनिटांनी प्रवाशांना मेट्रो उपलब्ध असणार आहेत. १२ ते ४ या वेळेत दर पंधरा मिनिटांनी मेट्रो उपलब्ध असणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रवाशांना मेट्रो ने प्रवास करण्यासाठी तिकीट हे रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीजवळ मिळणार आहे.

मोठी बातमी! ऑगस्टमध्ये 14 दिवस बँका राहणार बंद; पाहा सुट्ट्यांची यादी

त्याचबरोबर ज्या लोकांना व्हाट्सअप वरून तिकीट पाहिजे असेल त्या लोकांनी 99420101990 हा क्रमांक मोबाईल मध्ये सेव करून या क्रमांकावर Hi चा मेसेज केल्यानंतर तिकीट पर्याय येईल. त्यानंतर पेमेंट केल्यावर कोड मिळेल.

Alcohol Spray | अबब! ‘या’ जिल्ह्यातील शेतकरी पिकांवर करतात देशी दारूची फवारणी; याचा फायदा होतोय का? जाणून घ्या…

मेट्रोचे तिकीट दर?

  • रूबी हॉल ते पिंपरी चिंचवड ₹30
  • पिंपरी चिंचवड ते सिव्हिल कोर्ट ₹30
  • वनाझ ते पिंपरी चिंचवड ₹35
  • वनाझ ते डेक्कन जिमखाना ₹20
  • वनाझ ते रूबी हॉल ₹25
  • पिंपरी चिंचवड ते पुणे स्टेशन ₹30
  • पदवीपर्यंतच्या विध्यार्थ्यांना यामध्ये ₹30% सवलत
  • त्याचबरोबर शनिवार आणि रविवार सर्वांना ₹30% सवलत

शेतजमिनीवर घर बांधत असाल तर थांबा नाहीतर पाडावे लागले घर; पाहा नियम काय सांगतो

Spread the love