Pune Metro । पुणे मेट्रो सुरु झाल्यापासून अनेक जण मेट्रोने प्रवास करण्याचा आनंद घेत आहेत. मेट्रो ने प्रवास अत्यंत सुखकर होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेक जण मेट्रोने प्रवास करतात मात्र पुणे मेट्रो स्टेशनवर थरार पाहायला मिळाला. मृत्यू अवघ्या 30 मिनिट अंतरावर होता तरी देखील एक मायलेक मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बचावले आहेत. (Pune Metro Onilne Ticket Booking)
Manoj Jarange Patil । मुंबईला जाण्याआधी मनोज जरांगे पाटील ढसाढसा रडले; नेमकं काय घडलं?
स्टेशनवर उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या तत्परतेमुळे मेट्रो रेल्वेच्या ट्रॅक वर पडलेल्या मायलेकाचा जीव वाचला आहे. हा सुरक्षारक्षक हिरो ठरला आहे. पुणे मेट्रो प्रशासनातर्फे या सुरक्षारक्षकाचा सत्कार देखील करण्यात आला आहे. (Pune Metro News)
पुणे मेट्रो सुरक्षा रक्षक विकास बांगर याने प्रसंगावधान राखत ३ वर्षांच्या मुलाचे व त्याच्या आईचे प्राण वाचवले. दिनांक १९ जानेवारी २०२४ रोजी दुपारी २:२२ मिनिटांनी सिव्हिल कोर्ट उन्नत मेट्रो स्थानक येथे फलाट क्रमांक २ वरून एक 3 वर्षाचा मुलगा खेळतांना रुळावर पडला. त्यावेळी कामावर असणाऱ्या सुरक्षारक्षकाने मुलाला ट्रॅक वर पडताना पहिले. पडणाऱ्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात मुलाची आई देखील रुळांवर पडली. त्यावेळी प्रसंगावधान राखत सुरक्षारक्षक विकास बांगर याने फलाटावरील आपत्कालीन मेट्रो थांबविण्याचे प्लंजर (ई.एस.पी) बटन वेळीच दाबले.
त्यामुळे स्थानकाच्या दोन्ही दिशांनी वेगाने येणाऱ्या मेट्रो ट्रेन त्वरित थांबल्या यावेळी स्थानक आणि मेट्रो यामधील अंतर केवळ ३० मीटर इतके होते. मेट्रो ट्रेन थांबल्यानंतर मुलगा व त्याच्या आईला सुखरूप रित्या रुळांवरून बाहेर काढण्यात आले व परिवाराशी त्याची भेट करून देण्यात आली.
सुरक्षारक्षक श्री. विकास बांगर यांच्या समयसूचकतेबद्दल आणि धाडसी कार्याबद्दल पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनवणे (प्रशासन व जनसंपर्क), महाव्यवस्थापक सोमेश शर्मा (वित्त) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी स्थानक नियंत्रक व पुणे मेट्रोचे कर्मचारी उपस्थित होते.