Pune MNS News । राज ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश

Raj Thackeray

Pune MNS News । आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर अनेक बडे नेते पक्षांतर करत असल्याचे दिसत आहे. एकीकडे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी पक्ष बांधणी सुरू केली आहे तर दुसरीकडे बडे नेते , पदाधिकारी, कार्यकर्ते पक्ष सोडताना दिसत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला देखील मोठा धक्का बसला आहे.

Sharad Mohol | ब्रेकिंग! शरद मोहोळच्या हत्येमागील खरा मास्टर माईंड समोर; पोलिसांनी दिली माहिती

पुण्यात मनसेला मोठे खिंडार पडले आहे. (MNS in Pune has a big problem) मनसेच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. मनसेचे पदाधिकारी असलेल्या मंदार बलकवडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला आहे. त्यामुळे मनसेला पुण्यात मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे.

Sharad Mohol Murder । शरद मोहोळ हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर, दोन वकिलांनी…

पुण्यात आज भाजपची बैठक

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज पुण्यात बैठक पार पडत आहे. निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी व प्रत्यक्षात काम करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय प्रदेश पातळीवरील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ही बैठक आहे. भाजपची शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासोबत युती असणार आहे. मात्र या दोन्ही पक्षांच्या मदतीने 45 जागा निवडून आणण्यासाठी भाजपने नियोजन सुरू केले आहे.

Dhangar Reservation । धक्कादायक! धनगर आरक्षणासाठी युवकाचा टोकाचा निर्णय, संपवलं जीवन

Spread the love