
Accident News । वाहतुकीचे नियम (Traffic rules) कडक करूनही अपघातांचे सत्र थांबले नाही. दररोज होणाऱ्या अपघातात कित्येकांचा जीव जातो. अनेक अपघात (Accident) तर वाहन चालकांच्या एका चुकीमुळे होतात. अपघातात काहीजण कायमचे अपंग होतात. अपघातांमुळे कित्येकांचे संसार उध्वस्त होतात. सध्या एक भीषण अपघात झाला असून यात चालकाच्या चुकीमुळे क्षणात संपूर्ण कुटुंबच संपलं आहे. (Car Eicher Tempo Accident)
Tamil Nadu Rain । तामिळनाडूत पावसाचा धुमाकूळ; शाळा-कॉलेज बंद, गाड्याही रद्द
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावर हा भीषण अपघात (Pune-Nashik Highway Accident News) झाला आहे. संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावाजवळ वेगात असणाऱ्या कारवर आयशर टेम्पो कोसळला असून ओव्हर टेक करताना ही दुर्देवी घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एका महिलेला ग्रामस्थांच्या मदतीने वाचवण्यात यश आले आहे. (Latest Marathi News)
Big accident in Sinhagad Ghat । सिंहगड घाटात मोठी दुर्घटना! 12 पर्यटकांना घेऊन जाणारी जीप उलटली
कार पुण्यावरून नाशिकच्या दिशेने चालली होती. ती संगमनेर परिसरात आली असता कारने समोरून जाणाऱ्या आयशर टेम्पोला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचवेळी टेम्पो कारवर कोसळला. कारचा जागीच चुराडा झाला. अपघातानंतर टेम्पो चालक फरार झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले.