Pune News । सध्या पुण्यातील पिंपरी चिंचवड या ठिकाणावरून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मेंदूत रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला आहे. बाबुराव राठोड असं सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे.
दोन दिवसांपूर्वी ड्युटीवर असताना त्यांना तब्येत अस्वस्थ वाटू लागली होती. यानंतर त्यांना पुण्यामधील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये दोन दिवसापासून उपचार सुरू होते मात्र आज सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
तब्येत खालावली असल्याने त्यांना पुण्यातील नामांकित रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयामध्ये उपचार सुरू असतानाच आज बुधवारी त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधी देखील राठोड यांना ब्रेन हम्रेजमुळे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. ते ड्युटीवर असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.