Pune News । पुणे : ३ महिन्यापूर्वी पुणे जिल्ह्यातील सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून एका तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. आता या प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी शंतनू लक्ष्मण जाधवला अटक केली होती. लेशपाल जवळगे या तरुणाने प्रसंगावधान दाखवत या तरुणीचा जीव वाचवला होता.
प्राणघातक हल्ल्याने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला होता. भररस्त्यात हल्ल्याचा थरार पाहायला मिळाला होता. प्रेम संबंधास नकार दिल्याने आरोपीने तरुणीवर हल्ला केला होता. या आरोपीला ३ महिन्यानंतर जामीन मंजूर झाला आहे. त्याला तपास अधिकारी बोलवतील त्यावेळी तपासास हजर राहणे तसेच सात दिवसांत पासपोर्ट जमा करणे या अटींवर न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे.
Ajit Pawar । सर्वात मोठी बातमी! अजित पवार नाराज? मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर; नेमकं काय घडतंय?
दरम्यान, राजकारण्यापासून ते अभिनेत्यांपर्यंत अनेक व्यक्तींनी यावर संताप व्यक्त केला होता. “आपल्या देशात कायदा प्रबळ असल्याने त्यानुसार प्रक्रिया पार पडत आहे. 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील परंतु एका निरापराधाला शिक्षा नको व्हायला, असा अलिखित नियम पाळला जातो. या प्रकरणी योग्य कारवाई होऊन आरोपीला योग्य शिक्षा दिली जाईल,” अशी प्रतिक्रिया लेशपाल जवळगेने दिली आहे.
Salman Khan । सलमानची ‘ती’ अवस्था पाहून चाहत्यांना चिंता; म्हणाले, ‘काळजी घे’