
Pune News । डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वत्र डीजे वाजवला जात होता. सर्वजण डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करत होते. मग अचानक डीजेचा आवाज इतका मोठा झाला की सगळ्यांचीच डोकी अचानक सुन्न व्हायला लागली. डीजेचा मोठा आवाज ऐकून 250 जणांची प्रकृती अचानक बिघडली. कोणालाच काही ऐकू येत नव्हते. त्यानंतर गोंधळ उडाला. या सर्व रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Pune Crime | पुणे हादरलं! तीन दिवसांत तीन गोळीबाराच्या धक्कादायक घटना
14 एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त क्रांती चौकात देशभरातील सर्वजण गीताच्या तालावर तल्लीन झाले होते. शहरातील कार्यक्रमासाठी पुण्यातील 15 डीजे आमंत्रित करण्यात आले होते. कान फाटणाऱ्या डीजेसमोर तरुणांनी जोरदार नृत्य केले. या डीजेचा आवाज सुमारे 150 डेसिबल असतो.
Devendra Fadnavis । उपमखुमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांबाबत केला सर्वात मोठा गौप्यस्फोट
डीजेचा आवाज ऐकून तेथे उपस्थित लोकांची प्रकृती खालावली. डीजेचा आवाज ऐकून आजारी पडणाऱ्यांचे वय आश्चर्यकारक आहे. यामध्ये आजारी पडणाऱ्यांची संख्या वृद्धांची नसून तरुणांची जास्त आहे. डीजेचा आवाज ऐकून 17 ते 40 वयोगटातील लोकांचे कान सुन्न झाले. या वयातील 250 रुग्णांना रुग्णालयात पाठवण्याची वेळ आली आहे.
विहित मर्यादेपेक्षा जास्त आवाजात डीजे वाजवल्याबद्दल तीन मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. क्रांतीचौक पोलिसांनी तीन मंडळांविरुद्ध भारतीय दंड संहिता तसेच पर्यावरण संरक्षण कायदा आणि ध्वनी प्रदूषण नियमन व नियंत्रण कायद्यान्वये ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Salman Khan । सलमान खान गोळीबार प्रकरणात पुन्हा धक्कादायक माहिती समोर!