Pune News । पुण्यातील चाकण शिक्रापूर रोडवर गॅस टँकरचा स्फोट, अनेक घरांची पडझड; एक किलोमीटरपर्यंत स्फोटाचा आवाज

Pune News

Pune News । पुण्यातील चाकण शिक्रापूर रस्त्यावर गॅस टँकरमध्ये स्फोट झाला आहे. चाकण-शिक्रापूर रस्त्यावर गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटाने एक किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला आणि अनेक घरे कोसळली. मोहितेवाडी परिसरात रविवारी पहाटे हा अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही. मात्र, घर कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे.

Pune News । पुण्यात भरदिवसा पोलीस स्टेशन हद्दीत धक्कादायक प्रकार; सोन्याच्या दुकानावर दरोडा

या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. टँकरचा स्फोट झाल्याने परिसरात उभ्या असलेल्या इतर वाहनांनी पेट घेतला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांसह घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. टँकरमधून गॅस गळती झाल्याने हा स्फोट झाल्याचे वृत्त आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Navi Mumbai । नववी नापास तरुणाने युट्युबवर पाहून छापल्या नकली नोटा; पोलिसांना समजताच…

स्फोटाचे धक्के एक किलोमीटर दूरपर्यंत जाणवले

मिळालेल्या माहितीनुसार, चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील मोहितेवाडी परिसरात खाद्यपदार्थांचा ढाबा आहे. या ढाब्यावर नेहमीच रहदारी असते. रविवारी पहाटे या ढाब्यासमोर गॅस टँकर उभा असताना अचानक या टँकरने पेट घेतला. काही वेळातच गॅस टँकरचा स्फोट झाला. या स्फोटाचे धक्के एक किलोमीटर दूरपर्यंत जाणवले. कर्णकर्कश आवाजाने नागरिक भयभीत झाले.

Manoj Jarange । ब्रेकिंग! मनोज जरांगे यांची अचानक प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरु

Spread the love