Site icon e लोकहित | Marathi News

Pune News । पुण्यात गणपती विसर्जनाच्या वेळी हृदयद्रावक घटना; बाप आणि मुलगा दोघेही बुडाले

Pune News

Pune News । गणेशोत्सवाच्या आनंदाच्या वातावरणात पुण्यातील मावळ येथे एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. गणपती विसर्जनाच्या वेळेला घरगुती गणपती विसर्जन करत असताना संजय आणि हर्षल शिर्के या वडील-मुलाच्या बुडण्याची घटना घडली आहे. मावळ तालुक्यातील कडधे या गावात घरगुती गणपतीचे विसर्जन करत असताना संजय आणि हर्षल पाण्यात बुडाले आहेत.

Ajit Pawar । निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता

हर्षल पाण्यात बुडू लागल्याचे पाहून त्याचे वडील संजय यांनी ताबडतोब पाण्यात उडी मारली, पण दुर्दैवाने दोघेही बुडाले. घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ टीम, कामशेत पोलिस आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचले. रेस्क्यू टीमने संजय शिर्के यांचा मृतदेह शोधून काढला आहे, परंतु हर्षल शिर्के याचा शोध अजूनही सुरू आहे. या घटनेने मावळ परिसरात शोककळा पसरली आहे.

Mobile । मोबाईलचा हट्ट आला जीवाशी; पत्नीने उचलले टोकाचे पाऊल

घरगुती गणपतीचे विसर्जन करताना बाप लेक बुडाल्यामुळे संपूर्ण गावावर मोठी शोककळा पसरली आहे. यामुळे एकच गोंधळ माजला आहे. माहितीनुसार, बऱ्याच शोधानंतर बुडालेल्या विडलांचा मृतदेह सापडा, मात्र त्यांच्या मुलाचा मृतदेह अजूनही सापडलेला नसून शोधकार्य सुरू आहे.

Ajit Pawar । सर्वात मोठी बातमी! निवडणुकांच्या तारखांच्या आधीच अजित पवारांकडून पहिला उमेदवार जाहीर

Spread the love
Exit mobile version