Pune News । राज्यात लवकरच लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी हालचाली करण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाने लोकसभेचे तारखा जाहीर केल्यापासुन राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. अशातच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आगामी निवडणुकीसाठी मोठे निर्णय घेतले आहेत.
अमितेश कुमार यांनी निवडणुकीत सुरक्षा हेतूने आणि कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पुण्यातील 85 प्रतिष्ठित व्यक्तींची सुरक्षित सुरक्षा काढण्याच्या आदेश दिले आहेत. यामध्ये शहरातील विविध राजकीय पक्षांचे नेते बांधकाम व्यवसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश आहे. आगामी निवडणुका पारदर्शकपणे पार पाडाव्यात यासाठी जिल्हा प्रशासन कडून उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्ह्यातील सर्व राजकीय पोस्टर आणि बॅनर्स काढले आहेत.
Rohit Pawar । अमोल मिटकरी यांनी काढली रोहित पवारांची लायकी, म्हणाले; “तुझी खरी लायकी केवळ…”
दरम्यान पुण्यात साधारण ११० जणांना सुरक्षा दिली जाते, अशी माहिती आहे. यासाठी साडेतीनशे पेक्षा जास्त पोलीस कर्मचाऱ्यांचा वापर केला जात होता. आगामी लोकसभा निवडणुकीत यामुळे मनुष्यबळ कमी पडले असते. त्यामुळे अमितेश कुमार यांनी हा निर्णय घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत शासकीय जागेतील 11083 सर्व मालमत्तेच्या ठिकाणचे 19552 आणि खाजगी जागेवरील 1815 असे मिळून एकूण 32 हजार 550 जाहिराती फलक भिंतीवरील लेखन, बॅनर, पोस्टर हटवले आहेत.
Rakhi Sawant । अभिनेत्री राखी सावंतसाठी धक्कादायक बातमी समोर