Site icon e लोकहित | Marathi News

Pune News । पुण्यात सोसायटीत खेळत असलेल्या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, शरीराचे लचके तोडले; धक्कादायक व्हिडिओ समोर

Pune Dog Attack on Child Viral Video

Pune News । मागच्या काही दिवसापासून भटक्या कुत्र्यांचा मुद्दा चांगला चर्चेत आहे. भटक्या कुत्र्यांची काहीतरी सोय करावी यासाठी नागरिकांनी वारंवार प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. मात्र तरी देखील भटक्या कुत्र्यांची कोणतीही सोय झाली नसल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकांना आपला जीव देखील गमावावा लागतो. सध्या देखील पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोसायटीत खेळत असलेल्या एका चिमुकल्यावर अचानक तीन भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Pune Dog Attack on Child Viral Video)

Salaar Box Office Day 3 । प्रभासचा ‘सालार’ अवघ्या दोन दिवसांत ब्लॉकबस्टर ठरला, तिसऱ्या दिवशीचही कलेक्शन समोर; आकडा वाचून डोळे फिरतील

चिमुकला सोसायटीमध्ये खेळत असताना अचानक तीन भटक्या कुत्र्यांनी त्याचा पाठलाग केला. चिमुकला जीवाच्या आकांताने धावू लागला मात्र पळता पळता हा चिमुकला कोसळला. त्यानंतर त्या कुत्र्यांनी त्याचे लचके तोडले आहेत. यानंतर आरडाओरडा होताच कुत्र्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र या घटनेमध्ये चिमुकला गंभीर जखमी झाला आहे.

Bjp । मोठी बातमी! भाजपच्या दोन आमदारांमध्ये जुंपली

या घटनेमध्ये चिमुकला गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेच्या सीसीटीव्ही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुण्याच्या हांडेवाडी या परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर पुणे महानगरपालिकाकडे त्वरित कारवाईची मागणी देखील करण्यात आली आहे.

Mumbai News । धक्कादायक! ड्युटीवरून घरी जाताना पोलीस कॉन्स्टेबलचा मांजाने गळा चिरून मृत्यू

Spread the love
Exit mobile version