Pune News । पुण्यातील पिंपरी चिंचवड शहरात भोसरी भागातील सद्गुरू नगरमध्ये आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. अचानकपणे पाण्याची टाकी कोसळल्याने तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, बचाव पथक आणि अँब्युलन्स तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. बचाव कार्य सुरू करून जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. पोलीस देखील घटनास्थळी उपस्थित होते आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत होते.
Uddhav Thackeray | ब्रेकिंग! ठाकरे गटाची विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर; शिंदे गटाला थेट आव्हान
सध्या प्रशासनाकडून पाण्याची टाकी कोसळण्याचे कारण जाणून घेण्यासाठी तपास सुरू आहे. प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक कामगारांच्या माहितीनुसार, ही टाकी नुकतीच बांधण्यात आलेली होती. नागरिकांनी सांगितले की, टाकीत पाणी भरल्यामुळे ती कोसळली असावी. दुर्घटनेत जखमी झालेल्यांमध्ये सात ते आठ जण आहेत, ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Ajit Pawar । ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी आमदाराने केला अजित पवार गटात प्रवेश
या प्रकारामुळे पिंपरी चिंचवडमध्ये सुरक्षिततेच्या उपाययोजनांबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत. नागरिकांचा संताप यामुळे वाढला आहे, आणि त्यांना प्रशासनाकडून योग्य उत्तरांची अपेक्षा आहे. स्थानिक नेत्यांनी या घटनेवर गंभीर दृष्टीकोन ठेवण्याची गरज आहे आणि भविष्यात अशा दुर्घटनांपासून वाचण्यासाठी योग्य पावले उचलण्याची मागणी केली आहे. प्रशासनाकडून याबाबत अधिक माहिती लवकरच दिली जाईल.