Pune News । सरकारी अधिकारी (Government officials) होण्याचे स्वप्न बाळगत पुणे शहरात स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी अनेक विद्यार्थी येत असतात. राज्यभरातील वेगवेगळ्या भागांमधून विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुण्यात येऊन राहतात. मात्र आतापर्यंत अशा काही घटना घडल्या आहेत ज्यामुळे पुणे चांगलेच हादरून गेले आहे. यामधील अशीच एक घटना म्हणजे पुण्यात विदर्भातील वाशिम जिल्ह्यातून अभिलाषा मित्तल (Abhilasha Mittal) स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आली होती मात्र 7 एप्रिलला तिने आपले जीवन संपवले. तिने गळफास घेत आत्महत्या केली होती. याप्रकरणी पुण्यात मोठी खळबळ उडाली होती.
Jayant Patil । “घासूनपुसून काम करा, कुणाच्या घरी चहा…”, जयंत पाटलांचा पदाधिकाऱ्यांना दम
यानंतर या प्रकरणाचा तपास पोलीस यंत्रणा करत होती. या तरुणीच्या मृतदेहाचे शिवविच्छेदन केल्यानंतर तिच्या अंगावर मारहाणीच्या खुना देखील होत्या. त्यामुळे संशय निर्माण झाला होता. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी केली असता या प्रकरणाचा उल्गाडा झाला आहे. वसतिगृह चालकाने अभिलाषाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल त्याला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Nana Patole । नाना पटोलेंच्या कार अपघातप्रकरणी धक्कादायक बातमी समोर
अभिलाषाने का संपवले जीवन?
अभिलाषा ही वाशिम जिल्ह्यातील असून ती स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी पुणे शहरात आली होती. मात्र पुण्यात तिने ७ एप्रिल रोजी गळफास घेत आपले जीवन संपवल्याचा प्रकार समोर आला. अभिलाषा गुरुवार पेठ या ठिकाणी एका मुलींच्या हॉस्टेलमध्ये राहत होते. यावेळी होस्टेलमध्ये डिपॉझिटचे पैसे मागितले म्हणून वस्तीगृह चालकाने तिला मारहाण केली होती. आणि या मारहाणीमुळेच अभिलाषाने आपले जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे.