Pune News | पुण्याच्या नवीन पोलीस आयुक्तांनी घेतला धडाकेबाज निर्णय! आता पुण्यातील गुंडाना…

Amitesh kumar

Pune News | आयपीएस अधिकारी अमितेश कुमार यांनी गुरुवारी पुणे शहर पोलिस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, आर्थिक गुन्हे, सायबर गुन्हे, महिला सुरक्षा हे महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यावर मी लक्ष केंद्रित करणार आहे. पुणे पोलीस आयुक्त म्हणून अमितेश कुमार (Pune Police Commissioner Amitesh Kumar) यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.

Maratha Reservation । मराठा आरक्षणाबाबत समोर आली सर्वात मोठी बातमी!

मागच्या काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय आहे. या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे (Pune News) शहरात आता क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमितेश कुमार यांनी धडाकेबाज निर्णय घेतला आहे. गुन्हेगारांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी गुन्हे शाखेत क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट स्थापन केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

baba siddique | महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचा राजीनामा

अमितेश कुमार यांनी पुणे शहर पोलिस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच कुख्यात गुंड, रेकॉर्डवरील आणि झोपडपट्टी परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस ठाणे आणि पोलिस चौक्यांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना काही महत्वपूर्ण सूचना देखील दिल्या आहेत. पुणे शहर गुन्हेगारीमुक्त करण्याचा आमचा उद्देश असून कोणीही कायदा हातात घेऊ नये, अशा सूचना देखील सर्व गुन्हेगारांना देण्यात आल्या आहेत.

Ajit Pawar । प्रसिद्ध अभिनेत्रीने केली थेट अजित पवारांवर टीका; म्हणाली, “बेईमानी ओळखते…”

Spread the love