
Pune Crime । पुणे : राज्यात गुन्ह्याचे (Crime) प्रमाण वाढत चालले आहे. कायदे (Laws) कडक करून देखील अजून गुन्हेगारीला आळा बसला नाही. कित्येक गुन्ह्यांमधून अनेक निष्पाप लोकांचे प्राण जातात. धकाकदायक बाब म्हणजे क्षुल्लक कारणावरून गुन्हे घडत आहेत. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी (Pune Police) आता वेगळी युक्ती शोधून काढली आहे. गुन्हा केलेल्या ठिकाणीच पोलिसांनी गुन्हेगारांना चांगलीच अद्दल घडवली आहे. (Latest Marathi News)
Elephant Attack । प्रवाशांनी खचाखच भरलेल्या कारवर पिसाळलेल्या हत्तीनं केला हल्ला, काच फोडली आणि…
ही घटना पुण्यातील आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील हडपसर या भागात कारची तोडफोड करत एका टोळक्यानं चांगलीच दहशत निर्माण केली होती. यावर आता पुणे पोलिसांनी या टोळक्याला चांगलीच अद्दल घडवली आहे. ज्या परिसरात गाड्यांची तोडफोड केली त्याच परिसरात पोलिसांनी आरोपींची धिंड काढली आहे. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाला आहे.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी हडपसर भागात सात ते आठ गाड्यांची आणि परिसरातील दुकानांची तोडफोड केली होती. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. यावर आता पोलिसांनी कडक पाऊल उचलले आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे आता कौतुक केले जात आहे.