Sharad Mohol Murder । शरद मोहोळ हत्या प्रकरणी समोर आली सर्वात मोठी अपडेट! पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

Sharad Mohol

Sharad Mohol Murder । पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्या प्रकरणामुळे (Sharad Mohol Murder Case) पुणे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या हत्येनंतर पोलिसांच्या तपासाला वेग आला होता. या प्रकरणी पोलिसांनी १५ जणांना अटक केली आहे. दरम्यान आता या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे पोलिसांनी (Pune Police) सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. (Latest marathi news)

Ind vs Eng । भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या, ‘हा’ स्टार खेळाडू संघाबाहेर

पोलिसांनी शरद मोहोळ (Sharad Mohol) हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना मकोका (Mcoca act) लावला आहे. अटक केलेल्या 15 आरोपींसह फरार आरोपी गणेश मारणेवर (Ganesh Marane) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत कारवाई केली आहे. पुणे पोलीस रितेश कुमार यांच्याकडून या कारवाईचे आदेश दिले होते. पुण्यातील गुन्हेगारी मोडण्यासाठी पोलिसांनी मोठे पाऊल उचलेले आहे.

UGC on Reservation । मोठी बातमी! विद्यापीठातील एससी, एसटी, ओबीसी आरक्षण रद्द होणार? केंद्रानं दिलं स्पष्टीकरण

मकोका कायद्याअंतर्गत एखाद्या गुन्हेगाराला अटकपूर्व जामीन मिळत नाही. विशेष म्हणजे ‘मोक्का’ची कारवाई केलेला खटला हा विशेष कोर्टात चालवण्यात येतो. दरम्यान, पोलिसांनी गोळ्या घालणाऱ्या आरोपीला पकडलं होतं मात्र येते मागचा खरा मास्टरमाइंड वेगळा कोणतरी असल्याचा संशय पोलिसांना होता. या प्रकरणी साहील उर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे हे मास्टर माइंड असून ते सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.

Accident News । महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

Spread the love