Pune Rain News । पुणे शहरात मान्सूनपूर्व पावसाने नागरिकांना उष्णतेपासून दिलासा दिला असला तरी पहिल्याच पावसात शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले आहे. हवामानाचा अंदाज वर्तवताना पुणे वेधशाळेने शनिवारी पुण्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. शनिवारी सायंकाळीच अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. शहरातील अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
पुणे शहरातील शिवाजी नगर, जेएम रोड, हडपसर, सिंहगड रोड परिसर, वारजे या भागात जोरदार पाऊस झाला. शहरात झालेल्या जोरदार वादळामुळे जवळपास 25 ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याचे वृत्त आहे. याशिवाय शहरातील येरवडा परिसरात नागरिकांच्या घरात पाणी शिरले. यामुळे लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. लोक घरातून पाणी काढण्यात व्यस्त आहेत. अवघ्या तासाभरात शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचले.
पुण्यातील अनेक भागातील मुख्य रस्ते सध्या पाण्याखाली गेले असून त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. सध्या ही स्थिती पुढील चार ते पाच दिवस राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस महाराष्ट्राच्या या भागांत पावसाची शक्यता आहे. मान्सून सध्या महाराष्ट्राकडे सरकत आहे. सध्या तो मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर पोहोचलेला नाही. येत्या दोन-तीनमध्ये मान्सून मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात पोहोचू शकतो.
Supriya Sule । सुप्रिया सुळेंचे अजित पवारांना खुले आव्हान; म्हणाल्या…
#पुणे #सिंहगड रस्ता ब्रह्मा हॉटेलच्या समोरच्या गल्लीत कंबरपर्यंत पाणी तुंबले#punenews#punerain#pune pic.twitter.com/66v4bBCyaY
— Brijmohan Patil (@brizpatil) June 8, 2024