Pune Rape Case । पुणे बलात्कार प्रकरणात आरोपी आणि पीडितेमध्ये इतक्या रुपयांचा व्यवहार, धक्कादायक माहिती समोर

Pune rape Case

Pune Rape Case । पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमध्ये मंगळवारी (२५ फेब्रुवारी) घडलेल्या बलात्कार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडे याच्याविरुद्ध नवनवीन खुलासे समोर येत आहेत. 35 वर्षीय दत्तात्रय गाडे शिरुरच्या गुनाट गावातील रहिवासी आहे. या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली असून, त्याला 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Congress । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! काँग्रेसच्या बड्या नेत्याला जन्मठेपेची शिक्षा

या प्रकरणातील एक धक्कादायक दावा आरोपीच्या वकिलाने केला आहे. अॅड. सुमीत पोटे यांनी सांगितले की, आरोपी आणि पीडित यांच्यात 31 दिवसांपासून ओळख होती. यानंतर, घटनेच्या वेळी आरोपी आणि पीडित यांच्यात साडेसात हजार रुपयांचा पैशांचा व्यवहार झाला. वकिलांनी ही माहिती कोर्टासमोर मांडली, पण सुनावणीदरम्यान या पैशांच्या व्यवहाराबाबत अधिक तपशील सांगितला नाही.

Pratap Sarnaik । मोठी बातमी! एसटीचा मोफत प्रवास बंद होणार? परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला मोठा खुलासा

अॅड. पोटे यांनी पुढे सांगितले की, पीडित तरुणी आरोपीच्या मागे मागे जात होती आणि बसमध्ये प्रवेश करत असताना काही प्रकारची जबरदस्ती केली गेली नाही. त्याचप्रमाणे, घटनास्थळी पीडितेने पोलीस स्टेशनकडे तक्रार न करता तिच्या गावात परतण्याचा निर्णय घेतला.

Gaja Marne | सर्वात मोठी बातमी! कुख्यात गुंड गजा मारणे आईसोबत पोलीस ठाण्यात शरण

यावेळी आरोपीने पीडितेला साडेसात हजार रुपये रोख दिले होते, परंतु या पैशांच्या देणगीवरून वाद झाल्याची माहिती वकिलांनी दिली. तसेच, आरोपीने ऑनलाइन पैसे देण्याचे कबूल केले होते, पण पीडितेने रोख पैसे मागितल्यावर त्याने हे पैसे दिले. या खुलास्यानंतर तपास अधिक गहन करण्याचे संकेत मिळाले असून, आरोपीचा पोलीस कोठडीत तपास सुरू आहे.

IND vs PAK । रोहितचा इशारा आणि विराटने पूर्ण केली इच्छा, शतक पूर्ण करत भारताला विजय मिळवून दिला

Spread the love