Pune Chandni Chowk । पुणे : पुणेकरांची आता वाहतूक कोंडीतून (Traffic congestion) सुटका होणार आहे. कारण चांदणी चौकातील उड्डाणपूलासोबतच रस्त्यांचे काम पूर्ण झालेले आहे. आज केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते या चौकाचं लोकार्पण होणार आहे. त्याशिवाय पुण्यासोबत राज्यासाठी नवीन वाहतुक नियम (Traffic rules) लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Latest Marathi News)
या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली असून उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला गैरहजर राहण्याची माहिती आहे. या उदघाटनानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी (Chandni Chowk) खुला होणार आहे.
चांदणी चौकात सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय निघावा यासाठी स्थानिक नागरिकांसह लोकप्रतिनिधीकडून मागणी केली जात होती. नितीन गडकरी यांच्या हस्ते या कामाचे भूमीपूजन झाले होते. परंतु काही वर्षे हे काम रखडले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपामुळे पुन्हा या कामाला गती आली होती. आज या चौकाचं लोकार्पण होणार आहे.
Gadar 2 । बॉक्स ऑफिसवर ‘गदर २’ ची जादू, पहिल्याच दिवशी जमवला ‘इतका’ गल्ला
याच पार्श्वभूमीवर या परिसराची सुरक्षा वाढवली आहे. नितीन गडकरींच्या उपस्थितीत आज महत्त्वाची बैठक पार पडेल. तसेच नवीन नियमांचीही घोषणा होऊ शकते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज महायुतीचं शक्तीप्रदर्शन पाहायला मिळेल.
राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय! आता लॉटरी पद्धतीने नाही तर सर्व अर्जदारांना मिळणार शेततळे